Saturday, December 13, 2008

पुखराज



पुखराज रत्नाला हे नाव अत्यन्त साजेसे आहे.ह्या रत्नाला रत्नांचा राजा म्हणता येइल.सर्वाना माहित आहे की प्रत्येक राशीचे एक शुभ रत्नअसते,आपल्याला ग्रहांची मदत मिळावी ह्या साठी आपण ह्या रत्नांचा वापर करीत असतो.पण ह्या जगात कितीतरी लोक असे आहेत ज्याना आपली रास माहित नाही,पण ह्या लोकाना जर कोणते रत्न वापरायचे असल्यास पुखराज हे सर्वोत्तम रत्न आहे.पुखराज हे रत्न गुरु ह्या ग्रहाची मदत लाभावी ह्यासाठी धारण करण्यात येतो


आयुष्यातील प्रत्येक काम यशस्वी करण्यासाठी गुरुची मदत आवश्यक असते.गुरु हा नैसर्गिक शुभ ग्रह आहे आणि त्याचे भ्रमण नेहमीच शुभ फलदायी असते.प्रतिष्टा,नाव लौकिक,आत्मविश्वास,विद्या,शैक्षणिक प्रगति,वैवाहिक जिवनातील सुख,संतति सुख हे सर्व कही मिळावे ह्या साठी गुरु नेहमीच मदत करीत असतो.गुरु हा ग्रह जगाचा शिक्षक आहे.नीतिमत्ता जपणारा हा ग्रह आहे.हा ग्रह प्रत्येकाला फ़क्त आशिर्वाद्च देत असतो.तो कधीही कोणावर रागवत नाही.जेव्हा ह्या ग्रहाचा अस्त होतो,ह्या काळात ह्या ग्रहाची मदत पड़ते.पण ह्याचा अर्थ असा होत नाही की ह्या अस्ताच्या काळात तो कोणाचे वाईट करतो.आणि आता तर गेल्या - दिवस पासून अस्ताला गेलेल्या गुरुचे राश्यांतर होत आहे.जवळ पास एक वर्षाहून आधिक काळ तो आता मकर राशीत असेल


दिसम्बर २००८ च्या रात्री .३० नंतर आकाशात खुप लोकानी मनोरम्य देखावा पाहिला असेल.बुध,गुरु आणि चंद्र कोर ह्यानी' smiling face' picture तयार केले होते


पुखराज ह्या रत्नाला धारण करण्या साठी गुरुवार हा वार शुभ आहे.तय दिवशी दत्त गुरुंचे स्मरण करूँ घातलेला पुखराज यश निश्चित देईल.आज कल बाजारात अनेक प्रकारचे पुखराज उपलब्ध आहेत.पण चांगले रत्न कोणते आहे हे आपल्याला माहिती असने गरजेचे आहे.चांगला पुखराज फिकट yellow कलर चा,पारदर्शक आणि चकाकी असलेला असतो.ह्या रत्नाला सोन्यात बसवून उजव्या हातातील तर्जनी मधे घालावा


पुखराज जर चांगला नसेल तर त्याचे वाईट परिणाम पण होवू शकतात.जेव्हा ह्या stone मध्ये किंवा ब्लैक dots असतात,तेव्हा संपत्तीचा नाश होतो.जेव्हा ह्या stone मध्ये cracks असतात,किंवा तो transparent नसतो तेव्हा शत्रु कडून वैर वाढते आणि गृह कलह वाढतात.चांगल्या पुखराज ची किम्मत जास्त असते.ही त्याच्या वजनावर(karet) अवलंबून असते आणि तो किती karet चा असावा हे आपल्या body weight वर अवलंबून असते साधारण ४०-५० kg वजन असल्यास - karet चा पुखराज घालावा.

No comments: