Friday, February 13, 2009

दशावतार २

असे म्हणतात सत्य युगात सत्याचे प्रमाण १००% होते आणि कालचक्र प्रमाणे ते कमी होत गेले.आता कलियुगात सत्याचे प्रमाण फ़क्त २५% आहे.विष्णु देवाने आता पर्यंत ९ अवतार घेतले आहेत.सत्य युगात विष्णु देवाने मत्स्य,कुर्म (कसाव), वराह आणि नरसिंह हे अवतार घेतलेले आहेत.त्रेत युगात वामन, परशुराम आणि राम अवतार होते.कृष्ण देव हा द्वापर युगातील अवतार होता.बुद्ध कलियुगातिल अवतार होता।
खरेतर बुद्ध कलियुगाच्या शेवटी येणार होता पण कलियुगाच्या सुरुवातीलाच असत्याचे आणि अत्याचाराचे प्रमाण इतके जास्त वाढले होते की देवाला वेलेच्या आधीच अवतार घेउन पृथ्वीवर यावे लागले.विष्णुचा दहावा अवतार कालकी अजुन यावयाचा आहे.सध्या सुरु असलेल्या कलि युगाचा शेवट आज पासून ४,२८,८९९ व्या वर्षी होईल.

दशावतार

तिन्ही लोकाचा स्वामी हा शंकर देव आहे.तिन्ही लोक म्हणजे देव लोक ,पाताल लोक आणि पृथ्वी लोक.एकट्या शंकर देवाला ह्या तिन्ही लोकवर लक्ष ठेवणे अवघड जाऊ लागले म्हणुन त्याने त्याची जबाबदारी विभागून विष्णु देवाला आणि ब्रह्म देवाला दिली.विष्णु देवाला पृथ्वी लोकाची अतिशय किचकट जबाबदारी वाट्याला आली.पृथ्वीचे लोकजीवन एका कालचक्र प्रमाणे चालते.हिंदू संस्कृतीत ह्या कल्चाक्राला युग म्हणतात.ह्या युगाचे चार विभाग करण्यात आले आहेत.सत्ययुग,त्रेतयुग,द्वापरयुग आणि कलियुग.ह्या प्रत्येक युगात असत्याचा नाश करण्यासाठी विष्णु देवाला अवतार घ्यावा लागला.देव लोकामध्ये फ़क्त देवांचा वास असल्यामुळे आणि देव अमर असल्यामुळे ब्रह्म देवाला आणि शंकर देवाला अवतार घ्यावे लागले नाहीत।

सध्याचा कल कलियुगाचा.कलियुगाच्या शेवटी शंकर देव पृथ्वी वरच्या जिव सृष्टीचा नाश करेल आणि ब्रह्म देव परत सजीव सृष्टीचे निर्माण करेल आणि परत सत्ययुगाची सुरुवात होईल.पृथ्वी वरील एका महायुगाचा कालावधि ४३,२०,००० वर्षे आहे म्हणजे सृष्टी निर्माण होने आणि नष्ट होणे ४३,२०,००० वर्षानंतर होते.देवाला GOD म्हणतात...Generator,Operator and Distructor.