Saturday, December 6, 2008

हा दहषदवाद थांबेल का?

२६ नवम्बर २००८ हा एक भारतीय इतिहासातील अत्यन्त वाईट दिवस म्हणुन गणल्या जाईल.प्रत्येक भारतीय जो दहषदवादाच्या दराराखाली गेल्या कित्येक वर्षापासून वावरत आहे,आता तर ही दहषद प्रत्येकासाठी अगदीच असह्य झाली आहे.सकाळी बाहेर पडलेला घरातील व्यक्ति संध्याकाळी घरी येइल की नाही ह्या भीतीने प्रत्येकाच्या मनात घर केले आहे.वारंवार होणारे बोम्ब स्फोट,सीमेवर होणारे हल्ले ह्याने झालेल्या जखमा सुकल्या पण नव्हत्या अणि आपल्याच घरात घुसून केलेल्या ह्या मानवी हल्ल्याने जखंमा अजुन ओल्या केल्या आहेत
३ द्दिसेम्बर ला गेट वे ऑफ़ इंडिया ला रैली मध्ये प्रत्येक भारतियाच्या मनात दाबलेल्या मूक भावनेचा उद्रेक झालेला दिसत होता.ही रैली न कुणी प्लान केली होती,न कुणाला ठावुक होते की ही रैली इतकी भव्य असेल.फ़क्त एक आवाहन देण्यात आले होते-शहीदाना श्रद्धांजलि अर्पण करण्यासाठी गेट वे ऑफ़ इंडिया वर सर्वानी जमावे.कोणालाही कल्पना नव्हती इतके लोक तिथे जमले होते.अगदी शिस्तीत.प्रत्येकाला एकच संदेश द्यायचा होता,आता पुरे,आता आम्ही सहन करणार नाही.
नेहमीच हल्ल्यानंतर मुंबई करांचे कौतुक केल्या जाते.'Mumbai spirit' ह्या गोंडस नावाखाली विस्कलित झालेले जीवन,जणू कही झालेच नाही असे दाखवून normal करण्याचा प्रयत्न करण्यात येतो.पण आता प्रत्येक जन ओरडून सांगतोय की,कामावर जाने आमची मजबूरी आहे. सैनिका सारखे रोज लढाईवर गेल्या प्रमाने आम्ही घराबाहेर पडतो.पण आता आम्ही हे सर्व सहन करू शकत नाही
लोकानी भावना कितीही ओरडून सांगितल्या तरी त्याचा सरकार वर कही परिणाम झाला असे वाटत नाही.राज्याच्या chief minister & home minister ह्या पदावर कोणाला नेमायाचे ह्या साथी इतका उशीर लागावा ह्या सारखे दुःख नाही.केंद्रातील सरकार,हि निवड करताना आपण जनतेच्या भावना जपायला हवे हे विसरून,पक्षातील लोकांच्या भावना जपत होते.आगामी elections मध्ये आपल्याला कोणाचा फायदा होईल ह्याचा विचार जास्त केला जात होता.आज प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक मंत्र्याला 'Z Security' आहे अणि उरलेले आमदार खासदार स्वत :ला अणि त्यांच्या घराच्याना 'Z Security' असावी ह्यासाठी प्रयत्न करत आहेत.ह्या सर्वांची Security काढल्यावर जितके सैन्य जमा होइल ते जर सीमेवर अणि सगल्या बंदरान्वर नेमले तर दहशाद्वादी हल्ल्याना का थम्बवता येणार नाही?ह्या राजकारणी लोकांच्या विराट सभा,rallys, आपापसातील वाद विवाद, हयात सैन्याची energy फुकट वाया जाते.
आज जर हि स्थिति प्रत्येकाला समजत आहे,तर प्रत्येकानी आता मनात निश्चय करायला हवा.सरकार निवडून देणारे आपणच असतो.अमेरिकेतील जनता जर त्यांच्या विचाराच्या विरोधात जावून देशाच्या हितासाठी ओबामा ला निवडून देवू शकते तर आपण का नाही? मतदान करताना, आपल्या पुढे बहुतेकदा प्रश्न असतो की,दिलेल्या option मधे असलेले उमेदवार वाईट किंवा खुप वाईट असतात अणि मग आपण वाईट उमेदवार योग्य समजतो.जेव्हा आपल्याला उमेदवारांची नाव समजतात तेव्हा जर ते आपल्याला योग्य वाटत नसतील तर अपन सगाल्यानी मतदानावर बहिष्कार टाकायला हवा.आपल्या पैकी बरेच जन मतदानाला जात नाहीत. Upper class & educated लोकांचे मतदान करण्याचे प्रमाण आजही कमी आहे. Uneducaed लोकांवर आपण कसे काय विसम्बवुन रहू शकणार? पक्षाच्या उमेदावाराना ते ह्या लोकांचे मत विकत घेणे आजुन सोपे असते.आपण प्रत्येकाने जर आपल्या मतदानाचा योग्य वापर केला तर आपला विचार करणारे सरकार आपल्याला मिळेल.

No comments: