असे म्हणतात सत्य युगात सत्याचे प्रमाण १००% होते आणि कालचक्र प्रमाणे ते कमी होत गेले.आता कलियुगात सत्याचे प्रमाण फ़क्त २५% आहे.विष्णु देवाने आता पर्यंत ९ अवतार घेतले आहेत.सत्य युगात विष्णु देवाने मत्स्य,कुर्म (कसाव), वराह आणि नरसिंह हे अवतार घेतलेले आहेत.त्रेत युगात वामन, परशुराम आणि राम अवतार होते.कृष्ण देव हा द्वापर युगातील अवतार होता.बुद्ध कलियुगातिल अवतार होता।
खरेतर बुद्ध कलियुगाच्या शेवटी येणार होता पण कलियुगाच्या सुरुवातीलाच असत्याचे आणि अत्याचाराचे प्रमाण इतके जास्त वाढले होते की देवाला वेलेच्या आधीच अवतार घेउन पृथ्वीवर यावे लागले.विष्णुचा दहावा अवतार कालकी अजुन यावयाचा आहे.सध्या सुरु असलेल्या कलि युगाचा शेवट आज पासून ४,२८,८९९ व्या वर्षी होईल.
Friday, February 13, 2009
दशावतार
तिन्ही लोकाचा स्वामी हा शंकर देव आहे.तिन्ही लोक म्हणजे देव लोक ,पाताल लोक आणि पृथ्वी लोक.एकट्या शंकर देवाला ह्या तिन्ही लोकवर लक्ष ठेवणे अवघड जाऊ लागले म्हणुन त्याने त्याची जबाबदारी विभागून विष्णु देवाला आणि ब्रह्म देवाला दिली.विष्णु देवाला पृथ्वी लोकाची अतिशय किचकट जबाबदारी वाट्याला आली.पृथ्वीचे लोकजीवन एका कालचक्र प्रमाणे चालते.हिंदू संस्कृतीत ह्या कल्चाक्राला युग म्हणतात.ह्या युगाचे चार विभाग करण्यात आले आहेत.सत्ययुग,त्रेतयुग,द्वापरयुग आणि कलियुग.ह्या प्रत्येक युगात असत्याचा नाश करण्यासाठी विष्णु देवाला अवतार घ्यावा लागला.देव लोकामध्ये फ़क्त देवांचा वास असल्यामुळे आणि देव अमर असल्यामुळे ब्रह्म देवाला आणि शंकर देवाला अवतार घ्यावे लागले नाहीत।
सध्याचा कल कलियुगाचा.कलियुगाच्या शेवटी शंकर देव पृथ्वी वरच्या जिव सृष्टीचा नाश करेल आणि ब्रह्म देव परत सजीव सृष्टीचे निर्माण करेल आणि परत सत्ययुगाची सुरुवात होईल.पृथ्वी वरील एका महायुगाचा कालावधि ४३,२०,००० वर्षे आहे म्हणजे सृष्टी निर्माण होने आणि नष्ट होणे ४३,२०,००० वर्षानंतर होते.देवाला GOD म्हणतात...Generator,Operator and Distructor.
सध्याचा कल कलियुगाचा.कलियुगाच्या शेवटी शंकर देव पृथ्वी वरच्या जिव सृष्टीचा नाश करेल आणि ब्रह्म देव परत सजीव सृष्टीचे निर्माण करेल आणि परत सत्ययुगाची सुरुवात होईल.पृथ्वी वरील एका महायुगाचा कालावधि ४३,२०,००० वर्षे आहे म्हणजे सृष्टी निर्माण होने आणि नष्ट होणे ४३,२०,००० वर्षानंतर होते.देवाला GOD म्हणतात...Generator,Operator and Distructor.
Tuesday, January 13, 2009
मकर संक्रांत
सरत्या वर्षाला निरोप दिल्या नंतर नवीन वर्षी येणारा पहिला उत्सव हा मकर संक्रांत.ह्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो.सुर्याने मकर राशीत प्रवेश केल्या नंतर दक्षिणायन संपून उत्तरायण सूर्य होते.उत्तरायण वर्षातिल शुभ काळ समजल्या जातो.महाभारतात भीष्म जेव्हा जखमी अवस्थेत होते तेव्हा ते मृत्यु साठी ते मकर संक्रांतीची वाट पाहत होते,कारन उत्तरायण मृत्यु मोक्ष प्राप्ति देतो असा समज आहे.उदया १४ जानेवारीला दुपारी १२ वाजून ५ मिनिटानी सुर्याचा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश होइल.प्रवेश समयाच्या ६ तास आधी व ६ तास नंतर पुण्य काळ असतो.हा समय अतिशय शुभ मानल्या जातो.ह्या वेळी केलेले दान धर्म पुण्य देउन जातात.ह्या वर्षी मकर संक्रांत आणि संकष्टी चतुर्थी एकाच दिवशी येत आहेत.तीळ हे हविशान्न असल्यामुळे उपवासाच्या दिवशी पण ह्याचे सेवन करता येइल.
उत्तर भारतात पण हा दिवस खुप उत्साहात साजरा केला जातो.दक्षिणायनचा शेवटचा दिवस इथे होली पेटवून लोड़ी ह्या नावाने साजरा करतात.लोढ़ी हा तिलोधी ह्या शब्दाचा अपभ्रंश आहे .अग्नि देवाचे प्रतिक असल्यामुळे त्याचे स्वागत करण्यासाठी होली पेटवाली जाते.नवीन आलेल्या पिकाचे स्वागत पण ह्याद्वारे उत्साहात केल्या जाते।
उत्तर भारतात पण हा दिवस खुप उत्साहात साजरा केला जातो.दक्षिणायनचा शेवटचा दिवस इथे होली पेटवून लोड़ी ह्या नावाने साजरा करतात.लोढ़ी हा तिलोधी ह्या शब्दाचा अपभ्रंश आहे .अग्नि देवाचे प्रतिक असल्यामुळे त्याचे स्वागत करण्यासाठी होली पेटवाली जाते.नवीन आलेल्या पिकाचे स्वागत पण ह्याद्वारे उत्साहात केल्या जाते।
Thursday, January 1, 2009
नवीन वर्ष
नवीन वर्षाचे आगमन झाले की आसमंतात एक खुशिची लहर जाणवू लागते.नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी नेहमीच आठवतो तो शाळेत असताना येणारा नवीन वर्षाचा पहिला दिवस.शाळेत असताना दररोज तास सुरु होण्यापूर्वी वहीच्या उजव्या कोपर्यात तारीख लिहिण्याची सवय असायची.वर्षभर एक सन लिहिण्याची सवय असल्यामुळे,नवीन वर्षी नवीन सन जाणीवपूर्वक लिहिताना मजा यायची.आणि कितीतरी दिवस तारीख आणि महिना बरोबर लिहाल्या जायचा पण वर्ष मात्र चुकून जुनेच लिहिल्या जायचे.नवीन गोष्टी माणसाला नेहमीच उत्साह देत असतात.शाळेत असताना नवी कोरी पुस्तक आणि वह्या काही औरच आनंद देऊन जायचे.नवीन कपडे,नवीन वस्तु कोणत्याही वयातील व्यक्तीला खुश करतात.मग नवीन वर्षाचे आगमन सहाजिकच प्रत्येकाला आनंदी बनवणार.मागील वर्षातील अधूरी स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा प्रत्येकाला असते आणि ही आशा नविन वर्षात दडलेली असते.मागील वर्षातील नको असलेल्या घटनांपासून दूर जाण्यासाठी प्रत्येकाच्या मनात भावनांची घुसमट सुरु असते.आणि येणारे नवीन वर्ष आपल्याला आता ह्या वाईट घटना पासून दूर ठेवेल अशी इच्छा मनात ठेवत प्रत्येक जन नवीन वर्षाचे स्वागत अगदी मनापासून करीत असतो.नवीन वर्षाचे आगमन, येताना सोबत नवीन resolutions ची planning पण सोबत घेउन येते.पण हे resolutions नवीन वर्षातील किती दिवस किंवा महीने टिकणार ह्याचा अंदाज़ प्रत्येकाला आपल्या मनात असतोच.जरी हे resolutions जास्त दिवस टिकले नाही तरी, ह्याच्या failure ची जाणीव आपल्याला होते ती नवीन वर्षाच्या अगमनानेच.पण failure च्या भीतीने आपण new resolutions plan करने सोडायला नको,नाहीतर नवीन वर्षाच्या आगमनाची मजा कशी येणार।
Happy new year 2009..............
Happy new year 2009..............
Saturday, December 13, 2008
पुखराज

पुखराज रत्नाला हे नाव अत्यन्त साजेसे आहे.ह्या रत्नाला रत्नांचा राजा म्हणता येइल.सर्वाना माहित आहे की प्रत्येक राशीचे एक शुभ रत्नअसते,आपल्याला ग्रहांची मदत मिळावी ह्या साठी आपण ह्या रत्नांचा वापर करीत असतो.पण ह्या जगात कितीतरी लोक असे आहेत ज्याना आपली रास माहित नाही,पण ह्या लोकाना जर कोणते रत्न वापरायचे असल्यास पुखराज हे सर्वोत्तम रत्न आहे.पुखराज हे रत्न गुरु ह्या ग्रहाची मदत लाभावी ह्यासाठी धारण करण्यात येतो।
आयुष्यातील प्रत्येक काम यशस्वी करण्यासाठी गुरुची मदत आवश्यक असते.गुरु हा नैसर्गिक शुभ ग्रह आहे आणि त्याचे भ्रमण नेहमीच शुभ फलदायी असते.प्रतिष्टा,नाव लौकिक,आत्मविश्वास,विद्या,शैक्षणिक प्रगति,वैवाहिक जिवनातील सुख,संतति सुख हे सर्व कही मिळावे ह्या साठी गुरु नेहमीच मदत करीत असतो.गुरु हा ग्रह जगाचा शिक्षक आहे.नीतिमत्ता जपणारा हा ग्रह आहे.हा ग्रह प्रत्येकाला फ़क्त आशिर्वाद्च देत असतो.तो कधीही कोणावर रागवत नाही.जेव्हा ह्या ग्रहाचा अस्त होतो,ह्या काळात ह्या ग्रहाची मदत पड़ते.पण ह्याचा अर्थ असा होत नाही की ह्या अस्ताच्या काळात तो कोणाचे वाईट करतो.आणि आता तर गेल्या ४-५ दिवस पासून अस्ताला गेलेल्या गुरुचे राश्यांतर होत आहे.जवळ पास एक वर्षाहून आधिक काळ तो आता मकर राशीत असेल।
२ दिसम्बर २००८ च्या रात्री ८.३० नंतर आकाशात खुप लोकानी मनोरम्य देखावा पाहिला असेल.बुध,गुरु आणि चंद्र कोर ह्यानी' smiling face' picture तयार केले होते।
पुखराज ह्या रत्नाला धारण करण्या साठी गुरुवार हा वार शुभ आहे.तय दिवशी दत्त गुरुंचे स्मरण करूँ घातलेला पुखराज यश निश्चित देईल.आज कल बाजारात अनेक प्रकारचे पुखराज उपलब्ध आहेत.पण चांगले रत्न कोणते आहे हे आपल्याला माहिती असने गरजेचे आहे.चांगला पुखराज फिकट yellow कलर चा,पारदर्शक आणि चकाकी असलेला असतो.ह्या रत्नाला सोन्यात बसवून उजव्या हातातील तर्जनी मधे घालावा।
पुखराज जर चांगला नसेल तर त्याचे वाईट परिणाम पण होवू शकतात.जेव्हा ह्या stone मध्ये किंवा ब्लैक dots असतात,तेव्हा संपत्तीचा नाश होतो.जेव्हा ह्या stone मध्ये cracks असतात,किंवा तो transparent नसतो तेव्हा शत्रु कडून वैर वाढते आणि गृह कलह वाढतात.चांगल्या पुखराज ची किम्मत जास्त असते.ही त्याच्या वजनावर(karet) अवलंबून असते आणि तो किती karet चा असावा हे आपल्या body weight वर अवलंबून असते। साधारण ४०-५० kg वजन असल्यास ३-४ karet चा पुखराज घालावा.
Subscribe to:
Posts (Atom)