Tuesday, January 13, 2009

मकर संक्रांत

सरत्या वर्षाला निरोप दिल्या नंतर नवीन वर्षी येणारा पहिला उत्सव हा मकर संक्रांत.ह्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो.सुर्याने मकर राशीत प्रवेश केल्या नंतर दक्षिणायन संपून उत्तरायण सूर्य होते.उत्तरायण वर्षातिल शुभ काळ समजल्या जातो.महाभारतात भीष्म जेव्हा जखमी अवस्थेत होते तेव्हा ते मृत्यु साठी ते मकर संक्रांतीची वाट पाहत होते,कारन उत्तरायण मृत्यु मोक्ष प्राप्ति देतो असा समज आहे.उदया १४ जानेवारीला दुपारी १२ वाजून ५ मिनिटानी सुर्याचा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश होइल.प्रवेश समयाच्या ६ तास आधी ६ तास नंतर पुण्य काळ असतो.हा समय अतिशय शुभ मानल्या जातो.ह्या वेळी केलेले दान धर्म पुण्य देउन जातात.ह्या वर्षी मकर संक्रांत आणि संकष्टी चतुर्थी एकाच दिवशी येत आहेत.तीळ हे हविशान्न असल्यामुळे उपवासाच्या दिवशी पण ह्याचे सेवन करता येइल.

उत्तर भारतात पण हा दिवस खुप उत्साहात साजरा केला जातो.दक्षिणायनचा शेवटचा दिवस इथे होली पेटवून लोड़ी ह्या नावाने साजरा करतात.लोढ़ी हा तिलोधी ह्या शब्दाचा अपभ्रंश आहे .अग्नि देवाचे प्रतिक असल्यामुळे त्याचे स्वागत करण्यासाठी होली पेटवाली जाते.नवीन आलेल्या पिकाचे स्वागत पण ह्याद्वारे उत्साहात केल्या जाते।

Thursday, January 1, 2009

नवीन वर्ष

नवीन वर्षाचे आगमन झाले की आसमंतात एक खुशिची लहर जाणवू लागते.नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी नेहमीच आठवतो तो शाळेत असताना येणारा नवीन वर्षाचा पहिला दिवस.शाळेत असताना दररोज तास सुरु होण्यापूर्वी वहीच्या उजव्या कोपर्यात तारीख लिहिण्याची सवय असायची.वर्षभर एक सन लिहिण्याची सवय असल्यामुळे,नवीन वर्षी नवीन सन जाणीवपूर्वक लिहिताना मजा यायची.आणि कितीतरी दिवस तारीख आणि महिना बरोबर लिहाल्या जायचा पण वर्ष मात्र चुकून जुनेच लिहिल्या जायचे.नवीन गोष्टी माणसाला नेहमीच उत्साह देत असतात.शाळेत असताना नवी कोरी पुस्तक आणि वह्या काही औरच आनंद देऊन जायचे.नवीन कपडे,नवीन वस्तु कोणत्याही वयातील व्यक्तीला खुश करतात.मग नवीन वर्षाचे आगमन सहाजिकच प्रत्येकाला आनंदी बनवणार.मागील वर्षातील अधूरी स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा प्रत्येकाला असते आणि ही आशा नविन वर्षात दडलेली असते.मागील वर्षातील नको असलेल्या घटनांपासून दूर जाण्यासाठी प्रत्येकाच्या मनात भावनांची घुसमट सुरु असते.आणि येणारे नवीन वर्ष आपल्याला आता ह्या वाईट घटना पासून दूर ठेवेल अशी इच्छा मनात ठेवत प्रत्येक जन नवीन वर्षाचे स्वागत अगदी मनापासून करीत असतो.नवीन वर्षाचे आगमन, येताना सोबत नवीन resolutions ची planning पण सोबत घेउन येते.पण हे resolutions नवीन वर्षातील किती दिवस किंवा महीने टिकणार ह्याचा अंदाज़ प्रत्येकाला आपल्या मनात असतोच.जरी हे resolutions जास्त दिवस टिकले नाही तरी, ह्याच्या failure ची जाणीव आपल्याला होते ती नवीन वर्षाच्या अगमनानेच.पण failure च्या भीतीने आपण new resolutions plan करने सोडायला नको,नाहीतर नवीन वर्षाच्या आगमनाची मजा कशी येणार।
Happy new year 2009..............