Sunday, March 8, 2009

Happy Women's Day...

आज ८ मार्च, महिला दिनी ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.आपल्या घरासाठी मेहनत करणार्या आणि हे करत असतानाच समाजात आपले अस्तित्व निर्माण करणार्या आजच्या स्त्रीचा सन्मान ह्या निमित्त्याने केला जातो.

शेतकरी आत्महत्या हा महाराष्ट्रातील खुप महत्वाचा प्रश्न बनला आहे.कर्जबाजारी शेतकरी आपल्या बायको पोरांचा पुढचा मागचा विचार न करता मृत्युला बोलवत आहेत.आज महाराष्ट्रातल्या कितीतरी खेड्यातील घरान्मधे पुरूष नाहीत.घरातील स्त्रिनेच आपल्या वयस्क सासु सासरे आणि लहान मुलांसाठी हातात नांगर धरला आहे.प्रतिकूल परिस्थितीत मार्ग शोधण्याची स्त्रीची सहनशक्ति आणि चिकाटी ही पुरुषांपेक्षा निश्चितच जास्त असणार म्हणुनच देवाने मूल जन्माला घालण्याची अतिशय अवघड जबाबदारी स्त्रीला दिली।

प्रत्येक आई आपल्या मुलाच्या व मुलीच्या संगोपनासाठी लढत असते. दुःख आपल्या मुला पर्यंत येवू नये म्हणुन सतत प्रयत्न करीत असते.मूल जर शारीरिक आणि मानसिक आरोग्याने नोर्मल असेल तर आईचा संगोपनाचा त्रास थोड़ा कमी होतो.अशा मुलांची अभ्यासतिल आणि इतर कोणत्याही क्षेत्रातील प्रगति लवकर होते.पण जर मूल जन्मजात किंवा अपघाताने अपंग आहे,मूक,अंध किंवा मतिमंद आहे किंवा असाध्य आजाराने पीड़ित आहे,तर तय आईच्या यातना शब्दात व्यक्त करता येणे अवघड आहे.आपल्या मुलाला नोर्मल आयुष्य जगाता यावे ह्यासाठीची तिची धडपड आणि मेहनत खुपच जास्त असते।

एखाद्या क्षेत्रात यशस्वी झालेल्या मुलाच्या आईला ''आदर्ष माता '' पुरस्कार दिला जातो.अपंग मुलाना असे यश खुप अवघड असते पण तरीही त्यांची आई पण एक आदर्ष माताच आहे.समाजात अशा काही स्त्रीया आहेत ज्या उपेक्षित जीवन जगत आहेत आणि प्रतिकूल परिस्थितीत आपला मार्ग आक्रमत आहेत. यशस्वी स्त्रियांचा आपण जेव्हा सत्कार आणि सन्मान करतो तेव्हा आपण अशा स्त्रियांना विसरायला नको
Happy Womens Day.....